अग्निपथ योजने अंतर्गत 23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान भरती प्रक्रिया
प्रतिनिधी-संदीप कायगुडे
अग्निपथ योजने अंतर्गत भरती प्रक्रिया 23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात राहुरी इथं महत्मा फुले कृषी विद्यापीठात होणार आहे. या योजनेतील विविध पदांसाठी ही भरती असणार आहे. यामध्ये पुणे, बीड, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यातील उमेदवार सहभागी होऊ शकतात.
यासाठी उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे.