आठवडाभर आधीच नैऋत्य मौसमी पाऊस देशभरात दाखल
(निलेश गायकवाड)
नैऋत्य मौसमी पावसानं काल संपूर्ण देश व्यापला आहे, असं हवामान विभागानं जाहीर केलं. नेहमीच्या वेळापत्रकाच्या तुलनेत आठवडाभर आधी हा पाऊस देशभरात दाखल झाला. येत्या ४८ तासात ओडीशा आणि लगतच्या भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन ते वायव्य दिशेकडे प्रवास करेल. यामुळं मंगळवारपासून पुढे ४-५ दिवस राज्यात चांगला पाऊस होईल, असं हवामान विभागानं कळवलं आहे.
