June 29, 2025 3:54 pm

आरबीआय नोटांवरून महात्मा गांधीचा फोटो हटवणार ?

अपनी भाषा में पढ़े! Translate

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. ती म्हणजे, भारतीय चलन नोटांवर लवकरच रवींद्रनाथ टागोर व डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचेही फोटो असतील, असे वृत्त माध्यमांतून प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे नोटांवरून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो काढला जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत होता..आरबीआय, सिक्युरिटी प्रिंटिंग आणि मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि एपीजे कलाम यांचे दोन वेगवेगळे वॉटरमार्क सेट ‘आयआयटी, दिल्ली’ला पाठवले आहेत. प्रा. दिलीप टी साहनी यांना त्यापैकी एकाची निवड करण्यास सांगण्यात आले आहे.नंतर हा प्रस्ताव केंद्र सरकार समोर मांडणार असून, त्यावर केंद्र सरकार अंतिम निर्णय घेणार आहे. 2020 मध्येच ‘आरबीआय’ अंतर्गत समितीने महात्मा गांधी यांच्याशिवाय रवींद्रनाथ टागोर व एपीजे कलाम यांच्या फोटोच्या नोटा छापण्याची शिफारस केली होती, असे वृत्त व्हायरल होत होते..

‘आरबीआय’ च स्पष्टीकरण:

भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात ‘आरबीआय’ने एक निवदेन जारी करून या वृत्ताचे खंडन केलं.. या निवेदनात असं म्हटलंय, की ‘प्रसार माध्यमांमधून असं वृत्त दिले जातंय, की ‘आरबीआय’ सध्याच्या चलनी नोटांवरील महात्मा गांधी यांचा फोटो बदलून अन्य महापुरुषांच्या फोटोसह नोटा छापण्याची तयारी करीत आहे. माध्यमांमधून प्रसारित होत असलेली ही माहिती चुकीची असून, असा कोणताही प्रस्ताव ‘आरबीआय’समोर नसल्याचे या केंद्रीय बँकेने स्पष्ट केलंय.

‘आरबीआय’ने ट्विट करून एक प्रेस रिलीझ जारी केली असून, त्यात ही बाब स्पष्ट केली आहे.. अर्थ मंत्रालय व भारतीय रिझर्व्ह बँक नवीन मालिकेच्या नोटांवर रवींद्रनाथ टागोर आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या चित्रासह नोटा छापण्याचा विचार करीत असल्याच्या बातम्या माध्यमांतून प्रसिद्ध होत होत्या. मात्र, सध्या चलनात असलेल्या नोटांमध्ये कोणताही बदल केले जाणार नसल्याचा खुलासा ‘आरबीआय’ने केला आहे..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!