प्रा. नवनाथ सरोदे यांनी पी एच. डी प्रदान
कर्जत.गणेशवाडी ता. कर्जत येथील रहिवाशी व राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय खेडनगर येथील माजी हिंदी विभाग प्रमुख आणि सध्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती पुणे या महाविद्यालयात क्रीडा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असणारे प्रा. नवनाथ महादेव सरोदे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, यांनी आंतर शाखीय शारीरिक शिक्षण विषयातील विद्यावाचस्पती (पी एच.डी) पदवी ६ जून रोजी प्रदान केली. प्रा. नवनाथ सरोदे यांनी ” योग प्रशिक्षण कार्यक्रमाचा शालेय बास्केटबॉल खेळाडूंच्या निवडक कौशल्याधिष्ठीत शारीरिक सुदृढता घटक व कौशल्य कार्य मानावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास” या विषयावर पीएच.डी चे संशोधन केले. त्यांना मार्गदर्शक म्हणून डॉ. दयानंद कांबळे, क्रीडा विभाग प्रमुख, एस.बी. ई.एस. कॉलेज औरंगपुरा, औरंगाबाद यांनी काम पाहिले. हे संशोधन बास्केटबॉल खेळाडूंना खेळात चांगली कामगिरी करण्यासाठी उपयोगी पडणारे आहे अशी माहिती त्यांनी दिली. प्रा. सरोदे यांना शिक्षणाची आवड असल्याने ते नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेत असतात त्यांनी आजपर्यत कला शाखा, क्रीडा, योगा, आहारशास्त्र व पत्रकारिता यामध्ये पदविका प्राप्त केली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या सरचिटणीस मा. प्रमिलाताई गायकवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. सुनील ठाकरे व सर्व सहकारी प्राध्यापकांनी विशेष सत्कार करून अभिनंदन केले, तसेच गणेशवाडी गावातील प्रथम पी एच.डी प्राप्त असल्यामुळे परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.