June 29, 2025 9:14 pm

इंदापूर व बारामती मधील 200 जणांवर तडीपार होण्याचा प्रस्ताव तयार

अपनी भाषा में पढ़े! Translate

इंदापूर व बारामती मधील 200 जणांवर तडीपार होण्याचा प्रस्ताव तयार

(निलेश गायकवाड )

पुढील काही दिवसात बारामती व इंदापूर तालुक्यातील दोनशे जणांवर तडीपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिली. अवैध दारू विक्री प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची कुंडली पोलिसांनी तयार केली असून यापुढील काळात अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध पोलीस कठोर कारवाई करणार आहेत त्याअंतर्गत या दोनशे जणांवर तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.दरम्यान तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निंबुत येथे गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारु विक्री करणाऱ्या प्रकाश चैनसिंग नवले (वय 52) याच्या विरोधात पुण्याच्या जिल्हाधिकाऱयांनी एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. त्याला या कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांनी पोलिसांना दिल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिली. वडगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी नवले याच्या विरोधातील प्रस्ताव तयार केला होता. नवले याच्यावर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात २५ गुन्हे दाखल आहेत. हा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांच्याकडून मंजूरीसाठी जिल्हाधिकाऱयांकडे पाठविण्यात आला होता. त्यास जिल्हाधिकाऱयांनी मंजूरी देत नवले याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. वडगाव निंबाळकर पोलिसांनी नवले याला येरवडा कारागृहात दाखल केले.वडगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लांडे यांच्यासह उपनिरीक्षक योगेश शेलार, सलिम शेख, सहाय्यक फौजदार जगताप, हवालदार महेश बनकर, रमेश नागटिळक, दिपक वारुळे, अमोल भोसले, नितीन बोराडे, महादेव साळुंके, पोपट नाळे, अमोल भुजबळ, प्राजक्ता जगताप यांच्या पथकाने एमपीडीए कायद्यांतर्गत प्रस्ताव दाखल कऱण्यासाठी परिश्रम घेतले.उपविभागात २० जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाईबारामती उपविभागातील सहा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध हातभट्टीची दारु विकणाऱया २० जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाईसाठी यादी बनविण्यात आली आहे. एकूण १५० दारु विक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई कऱण्यात येणार आहे.- गणेश इंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!