लडाखमधे लेह जिल्ह्यात बस कोसळून झालेल्या अपघातात भारतीय लष्कराच्या सात जवानांचा मृत्यू, १९ जण जखमी
लडाख मध्ये लेह जिल्ह्यात तुरतुक जवळ आज सकाळी एक बस कोसळून झालेल्या अपघातात भारतीय लष्कराच्या सात जवानांचा मृत्यू झाला. तर १९जण गंभीररित्या जखमी झाले. हे २६ जवान पर्तापूर संक्रमण शिबिरातून तुरतुक सेक्टरमधल्या हनीफ भागात निघाले होते. बस चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं ही बस रस्त्यावरून घसरून श्योक नदीत कोसळली. जखमींना रुगणालयात दाखल केलं आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात देशानं आपले शूर जवान गमावले आहेत असं ट्विट मोदी यांनी केलं आहे. जखमींना सर्वतोपरी सहाय्य दिलं जात असून, ते लवकर बरे व्हावेत, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.