June 29, 2025 9:18 pm

शिरपूर येथे “अखिल भारतीय एस. व्ही. के. एम. टी-20 महिला चॅम्पियन्स ट्रॉफी-2022” चे आयोजन..

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर : श्री विले पार्ले केळवाणी मंडळ व धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “अखिल भारतीय एस. व्ही. के. एम. टी-20 महिला चॅम्पियन्स ट्रॉफी-2022” चे आयोजन दि. 1 जून 2022 ते दि. 8 जून 2022 पर्यंत शिरपूर येथे करण्यात आले असून क्रिकेट रसिकांना मोठी मेजवानी मिळणार आहे.सदर स्पर्धेचे उद्घाटन 1 जून 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता शिरपूर तालुक्यातील तांडे येथील मुकेश आर. पटेल सीबीएसई निवासी स्कूल च्या भव्य मैदानावर प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेत भारतातील विविध भागांतील 20 महिला क्रिकेट संघांनी सहभाग घेतला असून सदर स्पर्धेतील सर्व सामने साखळी पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत. सर्व खेळाडू यांची उत्तम निवासाची व जेवणाची तसेच इतर सर्व सोय मोफत सोय करण्यात आली आहे.हे सामने तांडे येथील मुकेश आर. पटेल सीबीएसई निवासी स्कूल च्या भव्य मैदानावर दिवस-रात्र, सावळदे येथील एस. व्ही. के. एम., एन. एम. आय. एम. एस. शिरपूर कॅम्पस च्या भव्य मैदानावर दिवस-रात्र तसेच शिरपूर शहरातील आर. सी. पटेल फार्मसी कॉलेजच्या भव्य मैदानावर फक्त दिवसा खेळविण्यात येणार आहेत.या महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी मोठ्या स्वरूपात बक्षिसे जाहीर करण्यात आले आहेत. विजेत्या संघाला 71 हजार रुपयांचे रोख बक्षीस व चषक, उपविजेत्या संघाला 51 हजार रुपये रोख व चषक तसेच स्पर्धेतील तिसरे स्थान पटकावणाऱ्या महिला क्रिकेट संघाला 31 हजार रुपयांचे रोख बक्षीस व चषक देवून गौरविण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट यष्टीरक्षक तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा महिला खेळाडूंना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.सदर महिला क्रिकेट स्पर्धांचा आनंद लुटण्याची संधी शिरपूर व परिसरातील क्रिकेटप्रेमींना मिळाली आहे. धुळे जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.या स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी लाभ घेण्याचे आवाहन धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हा क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष तथा श्री विले पार्ले केळवाणी मंडळ सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, लहू पाटील, प्रकाश पाटील व कार्यकारी मंडळ यांनी केले आहे.विशेष बाब म्हणजे, आयोजकांकडून सर्व सुविधा मोफत पुरविण्यात येणार आहेत. सर्व महिला क्रिकेटपटूंना येण्या-जाण्याचा खर्च, राहण्याची व निवासाची सोय, तसेच मैदानावर क्रिकेट ड्रेस, क्रिकेट खेळण्याच्या कालावधीत मोफत मेडिकल सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!