June 30, 2025 3:25 am

डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे आरोग्यसेवक वसीम शेख यांनी वाचवले रुग्णाचे प्राण

अपनी भाषा में पढ़े! Translate

22 मे हा दिवस हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा रक्तदान दिन म्हणून नेहमीच आठवणीत राहील, ‘रक्तदानाच्या’ निमित्ताने आजचा दिवस हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा साठी कौतुकास्पद् व खासच होता. वैद्यकीय मदत कक्षाचे संपर्क समन्वयक जितेंद्र भाऊ यांच्या मार्गदर्शनात आज सिव्हिल हॉस्पिटल येथे रक्ताच्या कमतरतेमुळे मागणीवरून त्वरीत सर्व आरोग्यसेवकांनी रक्तदानाचे महान काम केले, त्यामुळे शासकीय रूग्णालयाला रक्ताचा साठा उपलब्ध झाला. त्यातच एक महत्वाची घटना म्हणजे ‘सारा हॉस्पिटल’ येथे एका रूग्णाला तत्काळ रक्ताची गरज आहे, पेशंट सिरीयस असुन त्यास त्वरीत रक्ताची आवश्यकता असल्याचा फोन कक्षाचे जळगाव जिल्हा समन्वयक डॉ.मोईज देशपांडे सर यांना आला. B+ रक्ताची तत्काळ आवश्यकता असल्याची माहिती मिळताच, त्यांनी तात्काळ तेच ब्लड ग्रुप असलेल्या मदत कक्षाचे आरोग्य सेवक वसीम शेख यांना संपर्क केला, वसीम भाई यांनी आपले सर्व काम बाजूला करून “रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा” या व्रत प्रमाणे “रेडप्लस ब्लड बँक” येथे तत्काळ पोहचले, आणि रक्तदान केले, रेडप्लस ब्लड बँकेच्या स्टाफ ने तत्काळ सर्व प्रक्रिया पुर्ण करून रक्त रुग्णा पर्यंत हॉस्पिटलमध्ये पोहचवले.आणि त्या रुग्णाचे प्राण वाचले. रुग्णाचे नातेवाईक आणि हॉस्पिटल स्टाफ ने वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकिय मदत कक्षाचे मनापासून आभार मानले.

या समयी नातेवाईकांचे अश्रु अनावर झाले होते.आरोग्यसेवक वसीम भाई यांच्या रूग्णसेवेचे जितेंद्रभाऊ गवळी, डॉ मोईज देशपांडे व संपूर्ण जळगाव जिल्हा मदत कक्ष टिमने आभार व धन्यवाद केले. रुग्णसेवेसाठीची वसीम भाई यांची धडपड, जिद्द बघुन मी ही भाउक झालो होतो. वसीम भाई याना मनापासून सलाम शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाला मदतीचा फोन आल्यानंतर तत्काळ कशा प्रकारे संपुर्ण यंत्रणा हलवली जाते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजची घटना ती म्हणजे संबंधित हॉस्पिटल कडून रूग्णाला मदतीसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकांना फोन जाणे, जिल्हा समन्वयक डॉ. मोईज देशपांडे यांनी दाखवलेली कार्य तत्परता, तेथुन पुढे जिल्हा समन्वयकांच्या सांगण्यावरून वैद्यकीय मदत कक्षाच्या समन्वयकाने तत्पर राहुन मदतीसाठी हजर राहून सदर रूग्णाला मदत करणे अत्यंत जलद अशीही क्रीया पार पडली. रूग्णाच्या कठीण परिस्थितीत धावून जातो तो म्हणजे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा समन्वयकच. मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब व मा.श्री खासदार डॉ.श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष समन्वयकांचे प्रेरणास्थान मा.श्री. मंगेशजी चिवटे सर आज यांच्यामुळे रुग्णसेवा प्रत्येक गरजूंना उपलब्ध करवून देणे सोपे झाले आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची महाराष्ट्रभर जाळ पसरलेलं आहे. आज वैद्यकीय मदत कक्षाच्या बनवलेल्या यंत्रणे मुळे सामान्य, गरिब-गरजु रूग्णांना समन्वयकाची जबाबदारी दिलेले आरोग्यसेवक मदत करू शकत आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव जिल्हा टिमचे मनापासून आभार व कौतुक केलं तेवढं कमीच असे कार्य आज वैद्यकीय मदत कक्षाचे समन्वयक करीत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!