June 29, 2025 7:02 pm

तांदुळवाडी येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

तांदुळवाडी येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महिलांनी केले रक्तदान…
तांदुळवाडी / प्रतिनिधी
अजिनाथ कनिचे
सालाबाद प्रमाणे मौजे तांदुळवाडी तालुका माढा येथे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री भगवंत ब्लड बँक बार्शी यांचे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराची सुरुवात महिला रक्तदात्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. सुरुवातीला जिजाऊ वंदना घेण्यात आली. त्यानंतर महिला रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये शुभांगी मिलिंद जाधव ,सुचिता गणेश परबत, रोहिणी नागनाथ जाधव, दैवशाला शांतीलाल गवळी ,रेश्मा श्रीकांत भोसले ,शुभांगी तानाजी शिंदे ,रेखा श्रीकांत जाधव ,वर्षा वैजीनाथ गवळी ,विद्या सुमंत गवळी, अरुणा अविनाश परबत या महिलांनी रक्तदान केले. यामध्ये एकुण ७७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद देत शिबिर पार पाडण्यासाठी सर्व मित्र मंडळ एकत्रितपणे राबत होते. सर्व रक्तदात्यांचे आयोजन समितीतर्फे आभार मानण्यात आले.
यावेळी सरपंच रणजितसिंह पाटील, उपसरपंच किरण गवळी, संभाजी ब्रिगेडचे शांतीलाल गवळी, अमोल उबाळे, वस्ताद विष्णू अनपट, दिगंबर गवळी, सुमंत गवळी, नागनाथ जाधव, गणेश परबत, सुधीर परबत, मधुकर गवळी, महादेव भोसले, अभिजित परबत, विजय परबत, केशव गवळी, अतुल गवळी, रवींद्र गवळी, भैय्या गवळी, वैजनाथ गवळी आदी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!