June 30, 2025 12:53 am

हर्षवर्धन पाटील यांनी घेतले लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शन..

अपनी भाषा में पढ़े! Translate

हर्षवर्धन पाटील यांनी घेतले लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शन..

इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे

प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेञ निरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथील श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिरामध्ये सध्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.15) श्री नृसिंहाची पूजा केली व दर्शन घेतले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी मंदिर परिसरातील चालू असलेले विकास कामांची पाहणी केली.

भीमा व नीरा या नद्यांच्या संगमावरती हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वसलेले असून, दक्षिण भारताचे काशी तर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. यावेळी श्री लक्ष्मी नृसिह देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त व पोलीस पाटील अभय वांकर यांनी हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार केला. राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे श्री लक्ष्मी-नृसिंह देवस्थान हे कुलदैवत आहे. त्यांनी लक्ष्मी- नृसिंह तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर करून निधी उपलब्ध करून दिल्याने या परिसराचा कायापालट झाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. चालू वर्षी चांगला पाऊस होऊन, नागरिक-शेतकरी सुखी समाधानी राहू दे, असे साकडे लक्ष्मी-नृसिंह चरणी घातल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी नीरा नरसिंहपूर ग्रामपंचायत कार्यालयात विजय सरवदे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार केला.

   

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!