चिंचणी मध्ये ‘आमदार ग्राम दत्तक योजना ‘ राबवणार – आ. बबनदादा शिंदे
पंढरपूर प्रतिनिधी गणेश ननवरे
चिंचणी येथे जिल्हा नियोजन समिती यांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या ग्रामीण वस्तु संग्रहालय इमारत बांधकाम करणे . 26 लाख रुपये या कामाच्या भूमिपूजन समारंभा निमित्त उपस्थित कार्यक्रम बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे उपस्थित होते. चिंचणी गावाला जिल्हा नियोजन समितीच्या वतीने पर्यटनाचा ‘क’ वर्ग दर्जा देण्यात आलेला आहे. या निधीतून या ठिकाणी येणारे पर्यटक व शहरी भागातील लोकांसाठी तसेच बचत गट व अनेक शासकीय योजनांच्या प्रशिक्षणासाठी इमारत बांधकाम करण्यात आलेले आहे. याच बरोबरीने ग्रामीण जीवन खाद्य, कला,परंपरा संस्कृती व ग्रामीण वस्तू संवर्धन या सर्वांची ओळख व्हावी म्हणून या ठिकाणी एक ग्रामीण वस्तूसंग्रहालय उभारण्यात येत आहे. यामधून येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून चिंचणी गावातील लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे व गावातील लोकांच्या विकास दर वाढण्यामध्ये मदत होणार आहे.याच बरोबर लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन त्या गावाचा मूलभूत व पायाभूत सुविधांसह विकास करण्याबाबत शासनाचे धोरण आहे .याचाच भाग म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून व आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून चिंचणी हे स्वतंत्र महसुली गाव असल्यामुळे या गावाला दत्तक घेऊन या गावांमध्ये पर्यटन विभागासह अनेक योजना राबवून हे गाव आदर्श गाव म्हणून महाराष्ट्रात नावलौकिक निर्माण करण्यासाठी या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार बबनदादा यांनी सांगितले.

या वेळी बोलताना जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे साहेब म्हणाले की चिंचणी गावाची खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण खेड्या कडे वाटचाल सुरू आहे .या वाटचालीमध्ये शासन म्हणून जे जे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सहकार्य करता येईल व अनेक योजना याठिकाणी राबवून या गावाला खऱ्या अर्थाने मदत करणार आहे .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन अनपट यांनी केले. सूत्रसंचालन समाधान काळे (सर )यांनी केले .तर आभार चंद्रकांत पवार यांनी मांनले .या कार्यक्रमासाठी उपजिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत घाडगे शाखा अभियंता कृष्णा गोरे ,नसीर शेख, कुलदीप कौलगे ऍड .बाळकृष्ण लामकाने, नागेश उपासे ,कृष्णा कोलगे ,सिद्धेश्वर देशमुख, दादा सावंत, महादेव सोनवले शशिकांत सावंत गोपाळ जाधव मच्छिंद्र पवार हनुमंत खर्चे तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.