June 29, 2025 8:57 pm

डुक्करांनाही लाजवेल असा भ्रष्टाचार
मतदार जनजागृतीच्या नावाने दरोडाच घातला !

अपनी भाषा में पढ़े! Translate

डुक्करांनाही लाजवेल असा भ्रष्टाचार
मतदार जनजागृतीच्या नावाने दरोडाच घातला !
कोणत्याही अधिका-याच्या विरोधात व व विशेषत: महिला अधिका-याच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करताना मी सावधानता बाळगतो.सबळ पुरावे हा मुख्य आधार असतो.
याच आधारे मी उल्हासनगरच्या उपायुक्त सौ.प्रियांका राजपुत यांच्याबाबत सदर लेखात जी माहिती सादर करणार आहे,त्यात आकडेच इतके बोलके आहेत की दुस-या पुराव्यांची गरजच पडू नये.


थर्ड पार्टी Audit च्या झंझटीपासून सुटका व्हावी यासाठी Amnesty Scheme सारखी योजना अस्तित्वात नव्हे जन्माला घातली गेली आहे. सात लाख मर्यादेतील खर्चास Third party Audit लागू होत नसल्याने महापालिकेत 200 कोटीची कामं “सात लाखाच्या आत” या मर्यादेत बसवून मंजूर केली गेली आहेत. त्यात अनेक बनावट व न झालेल्या कामांचा पण सराईतपणे अंतर्भाव केला जातो.परंतू कमिशनच्या लालसेपोटी अधिकारी व लोकप्रतिनिधी डोळे मिटून घेतात.
निवडणूक विभागाच्या उपायुक्त सौ.प्रियांका भरत राजपुत या त्यास अपवाद कशा ठरतील ? “निवडणुक व मतदान विषयी जनजागृती प्रचार व प्रसिद्धी” या गोंडस नावाखाली या उपायुक्तांनी यथेच्छ ताव मारला.माझ्या खात्रीशीर माहिती नुसार या ” सात लाखाच्या आत” स्किमखाली सुमारे दिड कोटीची खरी-खोटी कामं केल्याचे दर्शविण्यात आले. मी माहितीच्या अधिकारात कार्यादेशाच्या प्रतींची मागणी केली असता 7 लाखाच्या आतील 14 संचिका म्हणजे 98 लाखाची माहिती देण्यात आली अन्य 7 बनावट कामांचे कार्यादेश दडपून ठेवण्यात आले ?
दीड कोटीच्या कामांच्या 50-50 लाखांच्या 3 निविदा काढता आल्या असत्या परंतू सात लाखाच्या आतील 21 कोटेशनवर दीड कोटी उधळण्यात आले. राम इंटरप्रायजेस,दिशा इंटरप्रायजेस, सिद्धांत समाज विकास संस्था,मानव विकास सामाजिक सेवा संस्था,महेश इंटरप्रायजेस, श्रीकृष्ण इंटरप्रायजेस, त्रिभूवन इंटरप्रायजेस व अपुर्वा इंटरप्रायजेस या नामधारी संस्थांना दीड कोटीचे काम सात-सात लाखांचे 21 तुकडे करून देण्यात आले. या संस्थांच्या पत्यांचा जरी आयुक्तांनी वेध वा शोध घेतला तरी सर्व गैरप्रकार लक्षात येईल.त्याच-त्याच व्यक्तिंच्या या संस्था असल्याचे दिसून येईल. याचाच अर्थ हितसंबंधित व अधिकाधिक भ्रष्टाचारात साथ देऊ शकणा-यांची चोखंदळपणे मोट बांधण्यात प्रियांंका राजपुत यशस्वी झाल्या.
सात लाखाच्या आत बसविलेली कामा़ची रक्कमच इतकी बोलकी आहे की भ्रष्टाचाराची दुर्गंधी भसकन बाहेर येते.
1) 6,98,400, 2) 6,99,655,
3) 6,99,230, 4) 6,93,176
5) 6,94,292
सात लाखांच्या आत म्हणजे काय हे वरील आकड्यांवरून लक्षात येते.
या उपायुक्त राजपुत यांनी 19 जानेवारी रोजी आदेश दिल्यानंतर 25 जानेवारी आधी चार प्रभागात प्रत्येकी 6,98,400 रूपयांची कुठेही एक रूपया कमी वा जास्त नाही अशी Wall Painting ची कामं 38800 चौरस फूटाची करून घेतली व त्याची रक्कम होते 27 लाख 93 हजार 600 रूपये.अवघ्या पाच दिवसात 1 लाख 55 हजार 200 चौरस फूटाचे ,Wall Painting फक्त मिस्टर
इंडियाच करू शकेल‌. खादाडपणा व भ्रष्टाचाराचे हे गिधाडांनाही लाजवणारे कृत्य आहे.सर्वात मोठा भ्रष्टाचार तर पुढे पुढे दिसेल.
प्रत्येक प्रभागात मतदार नोंदणी जनजागृती प्रचार व प्रसिद्धी करीता पथनाट्य सादर करण्यासाठी एका पथ नाट्यासाठी 6200 दराने दोन प्रभागात 110 + 110 पथनाट्यं सादर करण्याचे प्रभाग क्र. 3 व 4 साठी प्रत्येकी 6 लाख 82 हजार असे 13 लाख 64 हजार खर्च दाखवण्यात आला आहे.प्रभाग क्र.1 व 2 च्या पथ नाट्याच्या दोन संचिका गायब आहेत. या उपायुक्तांनी 110 प्रमाणे 220 पथनाट्य कधी व कुठे सादर केलीत. प्रत्येकी 6200 प्रमाणे 220 पथनाट्यांचे बील अदा केल्याचा वा स्विकारल्याचा काही पुरावा राजपुत मैडम कडे आहे का ? महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जनजागृतीच्या भावनेने मोफत केलेल्या कला प्रदर्शनाचा असा कोणी गैर फायदा घेतला असेल तर मैला खाणारा डुक्कर ही शरमेने मान खाली घालेल.
या काळात फक्त नाश्त्यावर 1 लाख 41 हजार 400 रूपये खर्च करण्यात आले. चित्ररथावर 6 लाख 87 हजार 400 रूपये खर्च झाले. प्रत्येक प्रभाग समितीत एकाच दिवशी साऊंड सिस्टिम, मंडप, स्टेज,ट्राफी,फोटो,निमंत्रण पत्रिका, आदींवर एकुण 30 लाख 67 हजार इतका व सिद्धान्त संस्थेने वेगळा 6,99,655 असा 38 लाख खर्च झालेला दर्शविण्यात आला आहे.
यात मोठ्या ट्राफी 10 नग प्रत्येकी 9500 नुसार 95000 × 4 असे 3 लाख 80 हजाराच्या ट्राफ्या देण्यात आल्या‌.कोणाच्या बापाचे की स्वत:चे दुसरे लग्न होते की 3 लाख 80 हजाराच्या ट्राफी वाटण्यात आल्या ?
या शिवाय मास्क, प्रत्येकी 3890 नग प्रमाणे चार प्रभागात प्रत्येकी 3,37,430 नुसार 13 लाखांचे मास्क वापरण्यात आले ? मास्क जे बाजारात 10-15 रूपयांना मिळतात ते 87 रूपये दराने लावून प्रत्येक मास्क मागे 72 प्रमाणे 2 लाख 80 हजार प्रमाणे फक्त मास्कमधेच 11 लाख 29 हजाराचा भ्रष्टाचार झालेला आहे. ही रक्कम दडपण्यासाठी मला माहितीच्या अधिकारात फक्त प्रभाग समिती 1 व 2 चेच कार्यादेश देण्यात आले.3 व 4 चे कार्यादेश दडपण्यात आले.
या प्रकरणी बरीच चिरफाड करता येईल.तूर्तास आयुक्तांना एकच सांगणे गो-या रंगावर भाळू नका ! काळे अंतरंग ओळखून या भ्रष्टाचारात जे जे दोषी आहेत,त्यांच्यावर प्रशासकिय व फौजदारी कारवाई कराच.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
9822902470

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!