June 30, 2025 9:15 am

बोरगांव येथे होळी उत्सव आनंदात साजरा..

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर: तालुक्यातील बोरगांव येथे होळी उत्सव आनंदात साजरा करण्यात आला.पारंपरिक पद्धतीने हार, कंगन, गवऱ्या, फुलहार घालून होळी पूजन गावातील पोलीस पाटील, सरपंच व ज्येष्ठ मंडळींच्या शुभहस्ते करण्यात आले. होळी दहन झाल्यानंतर गावातील प्रत्येक जण होळीतील विस्तवाचा एक तुकडा आपल्या घरी पूजनासाठी घेऊन जात होता.

खेडे गावात आजही होळी सणा निमित्त शेवाळ्या, फुंणके, चिंचवाणी हे विशेष मेनू संध्याकाळच्या जेवनासाठी बनविले जातात. यावेळी सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, पोलीस पाटील मनोहर पाटील, ग्रा पं सदस्य दीपक राजपूत, रोहिदास कौतीक न्हावी, सुभाष न्हावी, विठ्ठल झुलाल कोळी, जगतसिंग राजपूत, कौतीक तोताराम येशी, लखा धनगर, गुलाब फुला भिल, बापू जोशी, रामचंद्र कोळी, तुकाराम येशी, तेजेंद्र राजपूत, संजीव पाटील, आनंदसिंग राजपूत, उमेश येशी, राहुल येशी, प्रथमेश जोशी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!