आता मध्यवर्ती पोलीसां विरोधात
उपोषण करण्याची नामुष्की !
२१ फेब्रुवारी २०२२ पासून फसवणूक,
बनवेगिरी तसेच एका बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हे दाखल असलेला युवराज धोंडू भदाणे हा आजतागायत पोलीसांना हुलकावणी देत मुंबई,ठाणे,
कल्याण,उल्हासनगर,नाशिक
परिसरात स्वैर भटकंती करित असूनही पोलिस हात हालवत “सापडत नाही,” अशी नकारघंटा वाजवत आहेत.
मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वपोनि मधुकर कड साहेब सदर आरोपिस जामिन मिळे पर्यंत मुभा देत असल्याचे मत सर्वत्र व्यक्त केले जात आहे.
अन्याय विरोधी संघर्ष समितिच्या वतीने पोलीसांना अनेक वेळा माहिती पुरवून देखील अटक करण्यात मध्यवर्ती पोलीस अपयशी ठरले आहेत.भदाणे हा काही आंतरराष्ट्रिय गुंड वा माफिया नाही तसेच तो मोठा gangster देखील नाही तर एक भूरटा बनावट सह्या करणारा,नोकरी चे आमिष दाखवून महिलेचे लैंगिक शोषण करणारा भूरटा गुन्हेगार आहे.
त्याला जर मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वपोनि मधुकर कड पाच सहा आठवड्यात अटक करू शकत नसतील तर ते मध्यवर्ती पोलीस ठाण्यात वपोनि पदास अपात्र आहेत.
येत्या दोन दिवसात जर फरार गुन्हेगारास अटक करण्यात त्यांना यश आले नाही तर वपोनि मधुकर कड यांची बदलि करण्याच्या मागणीसाठी पोलीस उपायुक्त कार्यालया समोर बेमुदत उपोषण करण्यात येईल,असा इशारा अन्याय विरोधी संघर्ष समितच्या वतीने अध्यक्ष दिलीप मालवणकर यांनी दिला आहे.