मदनवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शहाजी छबुराव बंडगर यांची बिनविरोध निवड
(निलेश गायकवाड)
इंदापूर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मदनवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शहाजी छबुराव बंडगर यांची निवड करण्यात आली.मावळते उपसरपंच सतीश लक्ष्मण सकुंडे यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सोमवार (दि. 30 )रोजी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अश्विनी मारुती बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलविण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी शहाजी बंडगर,माया शरद चितारे,तेजस देवकाते यांचा निर्धारित वेळेत 3 अर्ज प्राप्त झाले होते यावेळी तेजस देवकाते,माया चितारे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शहाजी छबुराव बंडगर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य तेजस देवकाते, ज्ञानेश्वर बंडगर, सतीश सकुंडे,अमोल बंडगर,अतुल देवकाते,प्रीती देवकाते,संगीता कुदळे,माया चितारे,दीपाताई ढवळे उपस्थित होते नवनिर्वाचित उपसरपंच शहाजी बंडगर यांनी ग्रामदैवत हनुमान महाराज व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले फटाक्यांच्या आतषबाजीत बंडगर यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.