तहसीलदार सुराणा यांची कारवाई — रेती टेम्पो पकडून आरोपांना दिलं उत्तर!
अमळनेर : विक्की जाधव
गेल्या काही दिवसांपासून अमळनेर येथील तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्यावर रेती वाहतुकीसंदर्भातील गंभीर आरोप होत होते. त्यांच्यावर असा आरोप घेतला जात होता की, रेती माफियांना ते पाठीशी घालण्यात. पैसे घेऊन कारवाई टाळतात, किंवा सरळसरळ कानाडोळा करतात.

या संदर्भात काही नागरिकांनी जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी अमळनेर यांच्याकडे तोंडी तक्रारीही केल्या होत्या, परंतु, या सर्व आरोपांना उत्तर देत तहसीलदार सुराणा यांनी पुराव्या शिवाय बोलू नका अशी कान सुनावणी केली होती. त्यानंतर तहसीलदार सुराणा यांनी रेतीची अवैध वाहतूक करणारा पहिला टेम्पो पकडत थेट तहसील कार्यालयात जमा करून कारवाईचा श्रीगणेशा केला.
ही कारवाई केवळ एक पावले उचलणे नव्हे, तर आपल्यावर लावलेल्या आरोपांना दिलेले प्रत्यक्ष उत्तर असल्याचे शहरात चर्चिले जात आहे. प्रशासकीय यंत्रणेमधीलच काहीजण चोर रेती वाहतूकदारांना माहिती पुरवत असल्याचा संशयही यानिमित्ताने व्यक्त केला जात आहे.
पत्रकारांवरही आरोपांची झलक
या प्रकरणात अजून एक वळण आलं ते स्थानिक पत्रकारांबाबत केलेल्या टीकेमुळे. शहरातील काही जाणकारांनी असा सवाल उपस्थित केला की, “पाकीट न मिळाल्यामुळेच काही पत्रकार तहसीलदारांवर लक्ष केंद्रित करत आहेत का?”
गेल्या काही दिवसांपासून एकाच वेळी विविध माध्यमांतून आलेल्या बातम्यांमुळे, स्वतः पत्रकारितेच्या निष्ठावानतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
‘डाग पुसला’ की नवा अध्याय सुरू?
सुराणा यांच्या या कारवाईनंतर अनेकांनी म्हटले की, “तहसीलदारांवरचा आरोपांचा डाग अखेर त्यांनी स्वतःच्या कृतीने पुसला आहे.”
हा फक्त एक टेम्पो पकडण्याचा प्रकार नव्हता, तर गेल्या कित्येक दिवसांच्या आरोपांना दिलेले ठोस प्रत्युत्तर ठरले आहे.
वाचकांसाठी महत्त्वाची नोंद:
हा विषय पुढे कोणती दिशा घेतो, प्रशासनातील आणखी काही जण तपासाआड येतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. बाकी वाचकांचा विश्वास मार्मिक सोबत आहेच. आम्ही वेळोवेळी वाचकांपर्यंत न पोचलेला विषय घेतोच..
पत्रकार, विक्की जाधव.