June 30, 2025 9:12 pm

खळबळजनक:लाच घेताना वाहतूक पोलिस कॅमेऱ्यात कैद,भिगवण येथील घटना

अपनी भाषा में पढ़े! Translate

खळबळजनक:लाच घेताना वाहतूक पोलिस कॅमेऱ्यात कैद,भिगवण येथील घटना

(निलेश गायकवाड)

वाहतूकीच्या नियम पाळण्याच्या बाबतीत आपल्याकडे अनेकदा हलगर्जीपणा केला जातो. अशांना जरब बसवण्यासाठी वाहतूक पोलिस असतातच. मात्र पोलिसच नियम धाब्यावर बसवायला लागले तर काय करायचे? अशीच एक घटना भिगवण पोलीस स्टेशनमध्ये असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची कॅमेऱ्यात कैद झाल्याने खळबळ उडाली आहे.

भिगवण येथील या व्हिडिओ असून यात एक पोलिस थेट खिशात लाच स्वीकारताना दिसत आहे. संबंधित व्हिडीओत पोलीस कर्मचारी वाहन चालकाकडून दोनशे रुपयांची मागणी करत आहे. चालक शंभर रुपयांसाठी तयार होतो. तो पोलीस कर्मचाऱ्याला त्यासाठी विनंती करतो. त्याचा आवाज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत स्पष्टपणे ऐकू येत आहे. मात्र, त्याच्या विनंतीनंतरही पोलीस ऐकत नाही. तसेच 5000 रुपयाचा दंड भरावा लागेल असे सांगण्यात येते. त्यानंतर वाहन चालक दोनशे काडून देतो .व ती रक्कम पोलीस कर्मचारी स्वतःच्या खिशात ठेवतो.

सदर घटनेमुळे पोलिसांची प्रतिमा मालिन झाली असल्याने भिगवण व परिसरातील नागरीक कारवाईची व निलंबनाची कारवाई मागणी करत आहे .सदर घटनेबाबत वरिष्ठ पोलीस दखल घेतली का व अश्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करतील का याकडे सर्वांचे लक्ष राहील .

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!