July 1, 2025 1:07 am

पिंपरी बुद्रुक गावात झाली उरुसाला सुरुवात.

अपनी भाषा में पढ़े! Translate

पिंपरी बुद्रुक गावात झाली उरुसाला सुरुवात.

प्रतिनिधी: समाधान रजपूत

तालुका इंदापूर येथील पिंपरी बुद्रुक गावात पिरसहेब साहेब यांचा उरुस गेल्या दोन वर्षात कोरोणाच्या नियमात साध्या पद्धतीने झाला पण यावर्षी उरूस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे पिंपरी बुद्रुक येथील सर्वधर्मसमभावाचे प्रतीक ग्रामदैवत पिरसाहेब उरूस २३ मार्च  पासून साजरा होत आहे त्या दिवशी देवाची पताका व झेंडा वाजत-गाजत गावाची प्रदक्षणा काढण्यात येते त्यावेळेस रंगांची उधळण करून देवावरती रंग टाकण्यात येतो.
दुसऱ्या दिवशी 24 मार्चला पिरसाहेब यांचा घोडा घेऊन गाव  प्रदक्षिणा काढण्यात येते व त्याच दिवशी संध्याकाळी  लेझीम व हलगीच्या तालावर  ती बाबांच्या नावांचा जयघोष होतो व त्या दिवशी रात्री ११ वाजता भाविकांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो तसेच 25 मार्च ला कुस्त्यांचे जंगी मैदान ही भरवण्यात येते.
शेवटी बाबांच्या यात्रेनिमित्त  प्रार्थना करून यात्रेची सांगता होणार आहे अशी माहिती सरपंच ज्योती  बोडके व उपसरपंच पांडुरंग हंबिराव बोडके व पिरसाहेब यात्रा कमिटी यांनी दिली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!