June 30, 2025 3:16 am

काशीविश्वेश्वर विद्यालयात इयत्ता १० वी ची परिक्षा सुरळीत सुरू.

अपनी भाषा में पढ़े! Translate

काशीविश्वेश्वर विद्यालयात इयत्ता १० वी ची परिक्षा सुरळीत सुरू.
प्रतिनिधी डॉ.संजीव पाटील.
भोकरदन:-तालुक्यातील सुरंगळी येथील काशीविश्वेश्वर विद्यालय उपकेंद्र क्र.३२१०/०३ या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग पुणे यांच्या आदेशाने शाळा तेथे परिक्षा केंद्र याप्रमाणे सुरंगली येथील काशी विश्वेश्वर विद्यालय येथे दहावी बोर्ड परीक्षा सुरु आहे.शाळेला अचानक भेट दिली असता, उपकेंद्रप्रमूख श्री सपकाळ ए.एन.यांनी परिक्षा सुरळीत चालू असल्याची माहिती दिली आमचे प्रतिनिधी डॉ.संजीव पाटील यांनी परीक्षा केंद्राला भेट दिली असता परीक्षा सुरळीत पार पडत असल्याचे दिसून आले.मुख्याध्यापक तथा उपकेंद्र प्रमुख ए.एन.सपकाळ हे स्वतः लक्ष देवून काळजी घेत आहे.
आज शिक्षण संस्थेचे सदस्य श्री संजय पाटील जाधव व श्री.डॉ.संजीव पाटील पत्रकार भेट दिली यावेळी परिक्षा व्यवस्थित चालू असल्यामुळे समाधान व्यक्त केले .
तसेच शाळेचे शिक्षक श्री.सय्यद एफ.एस,श्री जोगस ए.जी,श्री.शिरसाट डि.सी ,श्री. गावित ए .जी. यांनी परिक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहे आणि श्री राऊत व्हि.ए.( लिपीक ),श्री राजपुत बी .डी,श्रीमती मोरे व्हि. व्हि,श्रीमती फोलाणे एस .आर.हे परिक्षा केंद्रावर मुलांना पाणी सॅनी टायझर,थर्मल ने तपासणी करून परिक्षा हॉलवर सोडत आहे.

धोंडीबा राणुबा दांडगे यांचे निधन भोकरदन

भोकरदन तालुक्यातील सुरंगली येथील शेतकरी धोंडीबा राणुबा दांडगे यांचे आज दुपारी निधन झाले मृत्यू समयी ते 90 वर्षाचे होते . त्यांच्या अंत्यविधी हा उद्या सकाळी 10 वाजता सुरंगली येथे होईल.त्यांच्या मागे एक मुलगा,एक मुलगी,सुन,नातु, पंन्तु असा परीवार आहे. सुरंगली चे माजी सरपंच तथा काशी विश्वेश्वर मंदिर समिती चे उपाध्यक्ष काशीनाथ राव दांडगे यांचे ते वडील होत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!