अमळनेरातून ५० वर्षीय महिला बेपत्ता; कुटुंबीयांकडून शोध
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर शहरातून ५० वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकारामुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित महिला ३० ऑगस्ट रोजी घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी त्यांचा मुलगा सुनील पाटील यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव सरलाबाई निंबा पाटील असून त्या अमळनेर शहरातील आर. के. पटेल फॅक्टरीत कामाला असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. ३० ऑगस्ट रोजी फॅक्टरीत कामाला जात असल्याचे सांगून त्या घरातून निघाल्या; मात्र त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत.
कुटुंबीयांनी नातेवाईक तसेच परिचितांकडे शोध घेतला, मात्र अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे कुटुंबीयांकडून त्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून, नागरिकांना त्या आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.