नवी मुंबईतील सहायक फौजदाराच्या मृत्यूने खळबळ; कथित त्रासाचा आरोप करणारी नोट समोर

अपनी भाषा में पढ़े! Translate

Screenshot_2026-09-07-10-08-45-36_40deb401b9ffe8e1df2f1cc5ba480b12

नवी मुंबईतील सहायक फौजदाराच्या मृत्यूने खळबळ; कथित त्रासाचा आरोप करणारी नोट समोर

विक्की जाधव : मार्मिक न्यूज नेटवर्क

 

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक (फौजदार) पांडुरंग निंबा पाटील यांच्या मृत्यूच्या घटनेने अमळनेर तालुक्यासह पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पाटील हे अमळनेर तालुक्यातील पळासदडे येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी पाटील यांचा मृत्यू झाला. या घटनेपूर्वी त्यांनी लिहिलेल्या कथित नोटमध्ये काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून त्रास होत असल्याचा आरोप केल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात माजी उपायुक्त संजयकुमार पाटील, सहायक आयुक्त गिरीश ठाकरे तसेच हेड कॉन्स्टेबल जय अहिर यांच्या नावांचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची चौकशी करून न्याय मिळावा, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.

घटनेनंतर शनिवारी दुपारी पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर कथित व्हिडिओ शेअर केल्याचेही वृत्त आहे. त्यानंतर त्यांनी फोन बंद केला. घटनेची माहिती मिळताच पळासदडे येथील त्यांचे भाऊबंद व नातेवाईक नवी मुंबईकडे रवाना झाले. संबंधित प्रकरणात एफआयआर दाखल करून कायदेशीर कार्यवाही होईपर्यंत अंत्यविधी न करण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्याचे वृत्त आहे. पाटील यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!