डी. आर. कन्या शाळेत शिक्षक दिन उत्साहात; विद्यार्थिनींनी सांभाळली शिक्षकांची भूमिका

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260907-WA0554

डी. आर. कन्या शाळेत शिक्षक दिन उत्साहात; विद्यार्थिनींनी सांभाळली शिक्षकांची भूमिका

 

अमळनेर : विक्की जाधव.

खान्देश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती डी. आर. कन्या शाळेत ५ सप्टेंबर रोजी भारताचे पहिले उपराष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून सकाळ व दुपार विभागात उत्साहात साजरा करण्यात आला. मान्यवर तसेच विद्यार्थी प्रतिनिधींच्या हस्ते डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी व उपमुख्याध्यापक श्री. एस. आर. शिंगाणे होते. यावेळी पर्यवेक्षक एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी, ज्येष्ठ शिक्षक एस. एस. माळी, ज्येष्ठ क्रीडा शिक्षिका आर. एस. सोनवणे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शिक्षक दिनानिमित्त शाळेत ‘स्वयंशासन दिवस’ साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थिनींनी एक दिवसासाठी मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षिकांची भूमिका स्वीकारत प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य केले. दुपार विभागाच्या मुख्याध्यापिकेची भूमिका यशस्वी शिंगारे, तर सकाळ विभागाच्या मुख्याध्यापिकेची भूमिका जान्हवी साळुंखे यांनी पार पाडली. रोशनी पाटील, अश्मीरा शेख, अर्पिता अहिरराव, प्रांजल पवार, खुशी पाटील, माहेश्वरी न्याहाळदे, प्रांजल पाटील आदी विद्यार्थिनींनी शिक्षकांच्या भूमिका साकारत दिवसभर अध्यापनाचा अनुभव घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सकाळ विभागात आरोही गोसावी, तर दुपार विभागात निकिता पाटील यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकत शिक्षक म्हणून त्यांचे योगदान विद्यार्थिनींसमोर मांडले. दिवसभर अध्यापनाचा अनुभव घेतलेल्या विद्यार्थिनींनी मनोगतातून आपले अनुभव व्यक्त केले. सहभागी विद्यार्थिनींचा बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!