शिक्षक दिनीच अनुष्काची ‘एक्झिट’ सकाळी शिक्षकाची भूमिका साकारत विद्यार्थ्यांना शिकवले; दुपारी दुर्दैवी मृत्यूने कावपिंपरी हादरले

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिक्षक दिनीच अनुष्काची ‘एक्झिट’ सकाळी शिक्षकाची भूमिका साकारत विद्यार्थ्यांना शिकवले; दुपारी दुर्दैवी मृत्यूने कावपिंपरी हादरले

 

अमळनेर : विक्की जाधव.

शिक्षक दिनाचा उत्साह… वर्गात शिक्षकाची भूमिका साकारत विद्यार्थ्यांना शिकवणारी दहावीची विद्यार्थिनी… आणि काही तासांतच तिच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी! अमळनेर तालुक्यातील कावपिंपरी येथे ५ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अनुष्का रवींद्र सपकाळे या दहावीच्या विद्यार्थिनीचा राहत्या घरी दुर्दैवी मृत्यू झाला.

अनुष्का ही कावपिंपरी येथील सर्वोदय माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती. शिक्षक दिनानिमित्त सकाळीच तिने वर्गात शिक्षकाची भूमिका साकारत आपल्या सहकाऱ्यांना शिकवले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणाऱ्या या उपक्रमानंतर काही तासांतच अनुष्काच्या मृत्यूची बातमी समोर आली. त्यामुळे ‘सकाळी वर्गात शिक्षिका, दुपारी कायमची एक्झिट’ या घटनेने शिक्षकांसह विद्यार्थ्यांनाही मोठा धक्का बसला.

अनुष्काचे वडील काही वर्षांपूर्वीच मयत झाले होते, तर तिची आई सुरत येथे राहत असल्याने ती नातेवाईकांसोबत कावपिंपरी येथे राहत होती. ५ सप्टेंबर रोजी दुपारी साडेअडीचच्या सुमारास ही घटना घडली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अनुष्काला तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी दीपक सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कविता ठाणगे करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!