‘तू पोलिसांचा खबरी आहेस’ म्हणत तरुणावर कोयत्याने वार; प्राणघातक हल्ल्याने तरुण वाचला 

अपनी भाषा में पढ़े! Translate

‘तू पोलिसांचा खबरी आहेस’ म्हणत तरुणावर कोयत्याने वार; प्राणघातक हल्ल्याने तरुण वाचला 

 

अमळनेर : विक्की जाधव.

गांधलीपुरा भागातील भरुचा वाईन शॉपजवळ ५ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास सराईत गुन्हेगार राजेश उर्फ दादू धोबी याने एका तरुणावर कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. परेश रवींद्र उदेवाल (२८, रा. राजाराम नगर, शिरूड नाका) हे पायी जात असताना दादू धोबीने त्यांना अडवत अश्लील शिवीगाळ केली. ‘तू पोलिसांचा खबरी आहेस, तुझ्यामुळे मला त्रास होत आहे,’ असे म्हणत त्याने कमरेला लावलेला कोयता काढून परेश यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. परेश यांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढला असता आरोपीने त्यांचा पाठलाग केला. भरुचा वाईन शॉपजवळ पुन्हा अडवून मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला; मात्र परेश यांनी प्रसंगावधान राखत वार चुकवला आणि आरडाओरड केल्याने नागरिक धावून आले.

दरम्यान, दादू धोबीने नागरिकांवरही कोयता उगारून धमक्या दिल्याने संतप्त नागरिकांनी त्याला पकडून मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते व पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. परेश उदेवाल यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात राजेश उर्फ दादू धोबीविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम १०९ (१), ११५ (२), १२६ (२), ३५१ (२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!