मदनवाडीत श्री हनुमान दहीहंडी उत्सव २०२६ मोठ्या उत्साहात; पत्रकार चषकाचे आयोजन – आज सायंकाळी ६ वाजता थरार
प्रतिनिधी (निलेश गायकवाड)
भिगवण / मदनवाडी (ता. इंदापूर) – दरवर्षी प्रमाणे यंदाही मदनवाडी येथे श्री हनुमान दहीहंडी उत्सव २०२६ व पत्रकार चषक २०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि. ०७/०९/२०२६ रोजी सायं. ६.०० वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक (मदनवाडी), ता. इंदापूर येथे या उत्सवाला सुरुवात होणार आहे.
निमंत्रक व आयोजक –
या उत्सवाचे निमंत्रक पुणे जिल्हा परिषद सदस्या मा. सौ. मेघनाताई तुकाराम बंडगर, संस्थापक अध्यक्ष भिगवण पत्रकार संघ मा. श्री. दादासाहेब थोरात आणि अध्यक्ष श्री हनुमान दहीहंडी उत्सव मा. श्री. संतोष सुभाष ढवळे हे आहेत.
या उत्सवाचे मार्गदर्शक श्री. गोरख नाना मलगुंडे असून आयोजन माऊली अं. बंडगर, नानासो स. बंडगर, विकास दि. ढवळे, नामदेव पाटील व सर्व मित्र मंडळाने केले आहे.
दहीहंडी बक्षिस सौजन्य श्री. मोहन दादा शेंडगे तर ट्रॉफी सौजन्य पै. बंडा बंडगर, पै. सुरज ढवळे यांचे आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून –
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे कृषीमंत्री मा. श्री. दत्तात्रय (मामा) भरणे, सहकार मंत्री मा. श्री. हर्षवर्धन (भाऊ) पाटील, आमदार मा. श्री. राहुल (दादा) कुल, आमदार मा. श्री. यशवंत तात्या माने, जि.प. अध्यक्ष मा. श्री. विरधवल (बाबा) जगदाळे, मा. श्री. विश्वास (नाना) देवकाते, भिगवणचे आदर्श सरपंच मा. श्री. परागभाऊ जाधव, इंदापूर नगराध्यक्ष मा. श्री. भरतशेठ शहा यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सर्व सदस्य, सर्व गावचे सरपंच, उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून भिगवण व इंदापूर तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, उद्योजक आणि सन्माननीय पत्रकार बंधू – श्री. प्रशांत चवरे, श्री. भरत मल्लाव, श्री. तुषार क्षिरसागर, श्री. निलेश गायकवाड, श्री. आप्पासाहेब गायकवाड, श्री. सागर जगदाळे यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित राहणार आहेत.
इंदापूर तालुक्याची संस्कृती जपत कितीही विरोध असला तरी सर्वांना एकत्र घेऊन हा दहीहंडी उत्सव साजरा होत असल्याने या वर्षीच्या उत्सवाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तरी सर्व गोविंदा पथकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.