June 30, 2025 7:36 am

माढा लोकसभा युवासेना विस्तारक पदी उत्तम आयवळे यांची निवडीने युवासेनेत उत्साहाचे वातावण

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी माढा लोकसभेच्या युवासेना विस्तारकपदी उत्तम आयवळे यांची नियुक्ती केली आहे.
युवासेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.

उत्तम आयवळे यांनी यापूर्वीही माढा लोकसभा युवासेना विस्तारक पदी काम केले असल्याने व माढा लोकसभेतील युवा सेना कार्यकर्ते व सर्व पदाधिकारी यांच्याशी त्यांचे असणारे जिव्हाळ्याचे संबंध काम करण्याची पद्धत व युवा सेनेची मोट बांधून ठेवण्याची ताकद त्यांनी माढा लोकसभेत तयार केली होती त्याच कामाची पोचपावती म्हणून त्यांना पुन्हा एकदा माढा लोकसभा युवासेना विस्तारक पदी नियुक्ती केल्याने पुन्हा एकदा त्यांना आपले काम नव्या जोमाने पुढे न्यावे लागणार आहे.
माढा लोकसभा युवासेना विस्तारकपदी उत्तम आयवळे यांची निवड होताच शिवसेना, युवासेना कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून युवासेनेला पुन्हा एकदा माढा लोकसभेत ताकद मिळणार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!