संरक्षण दलांसाठी एक पद एक सेवानिवृत्ती वेतन निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब
संरक्षण दलांसाठी एक पद एक सेवानिवृत्ती वेतन या सरकारच्या निर्णयावर आज सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या पीठानं हा निर्णय दिला. सरकारचा हा धोरणात्मक निर्णय अनियंत्रित नाही आणि सरकारच्या धोरणात्मक गोष्टींमधे न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, असं या पीठानं स्पष्ट केलं.