न्यूज
ब्रेकिंग

भिगवण : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जन्मदिवस आणि अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त इंदापूरमध्ये “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर”

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-07-30 at 7.31.02 PM

भिगवण : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जन्मदिवस आणि अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त इंदापूरमध्ये “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर”

(निलेश गायकवाड)

इंदापूर, 30 जुलै : मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

200 – इंदापूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी
“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” या नावाने हे शिबीर शनिवार, दि. 01/08/2026 रोजी सकाळी 10 वाजता भिगवण येथील व्यंकटेश लॉन्स, मदनवाडी येथे होणार आहे.

शिबिराचा उद्देश काय?
ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे. तसेच जमीन, महसूल, दाखले यांसारख्या तक्रारींचा जलद निपटारा करणे आणि महसूल प्रशासनाला अधिक गतिमान व कार्यक्षम बनवणे हा या शिबिरामागचा मुख्य उद्देश आहे.

शिबिराचे उद्घाटन
या शिबिराचे उद्घाटन राज्याचे कृषीमंत्री मा. श्री. दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या शुभहस्ते होणार आहे.

उपस्थित राहणार
शिबिरासाठी विभागीय आयुक्त पुणे श्रीमती शितल तेली-उगले (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी पुणे श्री. जितेंद्र डुडी (भा.प्र.से.), अप्पर जिल्हाधिकारी श्री. सतिश राऊत, उपविभागीय अधिकारी बारामती श्री. उत्तम दिघे आणि तहसिलदार इंदापूर श्री. जीवन बनसोडे यांच्यासह महसूल विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा परिषद सदस्या सौ. मेघनाताई तुकाराम बंडगर आणि पंचायत समिती सदस्य हेमाताई माडगे व *श्री. जितेंद्र प्रल्हाद वणवे यांनीही नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

महसूल दिन 1 ऑगस्ट निमित्त आयोजित या शिबिरामुळे इंदापूर तालुक्यातील नागरिकांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!