गिरीम येथील ‘समाधान लॉज’वर मध्यरात्री पोलिसांचा छापा; एक परप्रांतीय चालवत होता नको तो व्यवसाय व्यवसाय.
प्रतिनिधी : विकी ओहोळ
दौंड – गिरीम गावालगत असणार्या वायरलेस फाटा या परिसरातील समाधान लॉजवर दौंड पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका व्यक्तीविरुद्ध स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम, 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 30 जुलै 2026 रोजी पहाटे 12.45 वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीच्या आधारे गिरीम येथील समाधान लॉज येथे छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान आरोपी रितेश कुमार रमतारी पासवान (वय 26) हा सहा महिलांच्या माध्यमातून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अनैतिक व्यवसाय चालवत असल्याचा संशय आल्याने त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस हवालदार निखिल बाळासाहेब जाधव यांनी फिर्याद दिली असून स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम, 1956 च्या कलम 3, 4 व 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाईत पोलिसांनी संबंधित महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याबाबत कायद्यानुसार आवश्यक प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI) बिद्री करत आहेत. या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.