अमळनेर पोलीस ॲक्शन मोडवर” ७० पोलिसानां घेऊन पो. नि. निकम यांचे तुफानी कोंबिंग ऑपरेशन; २४३ कारवाया..

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260730-WA0517

अमळनेर पोलीस ॲक्शन मोडवर” ७० पोलिसानां घेऊन पो. नि. निकम यांचे तुफानी कोंबिंग ऑपरेशन; २४३ कारवाया..

 

अमळनेर : विक्की जाधव.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर शहर व ग्रामीण भागात पोलिसांनी मध्यरात्री व्यापक कोंबिंग ऑपरेशन राबवत अवघ्या २४ तासांत तब्बल २४३ विविध प्रकारच्या कारवाया केल्या. या धडक मोहिमेत एक गावठी कट्टा, एक तलवार जप्त करण्यात आली असून गावठी दारू, जुगार व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यवसायांवरही कठोर कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या आक्रमक मोहिमेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे यांच्यासह विविध पोलीस अधिकारी व सुमारे ७० कर्मचाऱ्यांनी पैलाड, गांधलीपुरा, झामी चौक, जपान जीन परिसर तसेच ग्रामीण भागात एकाचवेळी धाडसत्र राबवले. यावेळी २५ हिस्ट्रीशीटरांच्या घरांची झडती, १६ हॉटेल व लॉजची तपासणी आणि १०० संशयित गुन्हेगारांच्या घरांची पाहणी करण्यात आली. या कारवाईत ५२ संशयित आढळून आले असून ६० जणांवर प्रतिबंधक कारवाई, १५ जणांना एनबीडब्ल्यू, ६ जणांना बीडब्ल्यू आणि २१ जणांना समन्स बजावण्यात आले.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही पोलिसांनी कठोर भूमिका घेतली. मोटार वाहन कायद्याअंतर्गत ४० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली, तर सार्वजनिक ठिकाणी वाहने उभी करून अडथळा निर्माण करणाऱ्या ७ जणांवर दंडात्मक कारवाई झाली. याशिवाय ओव्हरलोड प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनावरही कारवाई करून एकूण ₹५१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी ही मोहीम प्रभावी ठरल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, गावठी दारूच्या ९ हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या असून उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या ३२ जणांवर कारवाई करण्यात आली. जुगार अड्ड्यांवर धाड टाकून ५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले, तर तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या ३ जणांवरही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. अमळनेर पोलिसांच्या या धडक कोंबिंग ऑपरेशनमुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने अशा कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!