लवकरच बाजारात दिसणार ₹१० आणि ₹२० च्या प्लास्टिक नोटा; आरबीआयच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260729-WA0458

लवकरच बाजारात दिसणार ₹१० आणि ₹२० च्या प्लास्टिक नोटा; आरबीआयच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

 

मार्मिक न्यूज नेटवर्क : नवी दिल्ली.

भारतीय चलन व्यवस्थेत महत्त्वाचा बदल घडविण्याच्या दिशेने केंद्र सरकारने एक पाऊल उचलत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) ₹१० आणि ₹२० मूल्याच्या पॉलिमर (प्लास्टिक) नोटांच्या प्रायोगिक वापराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. प्रारंभी या नोटा फील्ड ट्रायलच्या स्वरूपात चलनात आणल्या जाणार असून, त्यानंतरच्या अनुभवाच्या आधारे नियमित चलनात समाविष्ट करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

आरबीआयच्या माहितीनुसार, पॉलिमर नोटा कागदी नोटांच्या तुलनेत अधिक टिकाऊ, पाण्याला प्रतिरोधक आणि बनावट नोटा तयार करणे कठीण असल्याने अधिक सुरक्षित मानल्या जातात. मात्र, या टप्प्यावर विद्यमान कागदी ₹१० व ₹२० च्या नोटा बंद करण्याचा कोणताही निर्णय नसून, त्या प्लास्टिक नोटांसोबतच चलनात कायम राहतील, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!