June 30, 2025 7:41 am

मनसे वाहतूक सेनेकडून आयपीएल खेळाडूंची बसची तोडफोड..

अपनी भाषा में पढ़े! Translate

मुंबई: आयपीएल मधील खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईतील व्यावसायिकांना न दिल्याने मनसेच्या वाहतूक सेनेने खेळाडूंसाठी असणारी बस येताच काल रात्री फोडली असल्याची माहिती आहे. काल रात्री 11 ते 11.30 वाजेच्या सुमारास ताज हॉटेलसमोर ही घटना घडली असल्याचं कळतंय. यामुळे वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे.

महाराष्ट्रात होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यात सरावासाठी आलेल्या संघातील खेळाडूंची हॉटेल ते स्टेडियम ने आण करण्यासाठी काही बसची व्यवस्था असते. अनेकदा इशारा देउनही मुंबईतील मराठी वाहतूक व्यवसायिकांना हे काम देण्यात आलेलं नाही, महाराष्ट्रातील व्यावसायिकांना डावलून परराज्यातील व्यावसायिकांच्या घशात घालायचा प्रयत्न सुरु होता. त्यामुळे मनसेने हा दणका दिला आहे, असा आरोप मनसेने केलाय.आयपीएल व्यवस्थापन आणि सरकार दरबारी विनंती करूनही काही बदल झाला नाही. काल रात्री सुमारे 11.30 वाजेच्या आसपास ताज हॉटेलच्या समोरच ही घटना घडली आहे. मनसे वाहतूक सेना उपाध्यक्ष प्रशांत गांधी यांनी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री ताज हॉटेलसमोर आयपीएलमधील संघासाठी आलेली बस फोडली असल्याची माहिती आहे. या प्रकरणी मनसे वाहतूक सेनेच्या उपाध्यक्ष प्रशांत गांधी यांच्यासह वाहतूक पदाधिकाऱ्यांना कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे.

महाराष्ट्रातल्या म्हणा किंवा मुंबईतल्या स्थानिक वाहतूकदारांना आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचं हे काम देण्याची मागणी मनसेने वारंवार केली होती. ही मागणी या आधीपासूनच लावून धरली होती. पण मराठी व्यावसायिकांऐवजी दिल्लीतील व्यावसायिकांना कामाचे कंत्राट दिले जाते, असा दावा पदाधिकाऱ्यांनी केलाय. म्हणून प्रशांत गांधी यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी मंगळवारी रात्री या बसच्या काचा आणि लाईट्स फोडले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो’ अशा घोषणा देत बसवर ‘मनसेचा दणका’ असं लिहिलेले पोस्टर चिकटवून मनसेने बसच्या काचा फोडत तोडफोड केली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!