आ. अमरिशभाई पटेल व आ.काशिराम पावरा यांच्या अथक प्रयत्नाने शिरपूर तालुक्यातील रस्त्यांसाठी 22.53 कोटींचा निधी मंजूर
शिरपूर : धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल व शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या अथक प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाच्या मार्च 2022 च्या अर्थसंकल्पात शिरपूर तालुक्यात आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील विविध रस्त्यांसाठी एकूण 22 कोटी 53 लक्ष 27 हजार रुपयांचा भरघोस आर्थिक निधी मंजूर झाला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विकासकामांची घोडदौड सातत्याने सुरु आहे.
माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांनी सातत्याने पाठपुरावा करून आतापर्यंत भरघोस निधी मंजूर करून आणला आहे.
शिरपूर तालुक्यात बिगर आदिवासी क्षेत्र थाळनेर, भाटपुरा, नागेश्वर मंदिर भोईटी रस्ता रामा – 16 किमी 140/0 ते 144/400 ची सुधारणा करणे ता. शिरपूर (भाग रामा – 4 ते भाटपुरा) साठी 1 कोटी रुपये.
पळासनेर, हाडाखेड, सुळे, दहिवद रस्ता रा.मा. 1 अ कि.मी. 3/00 ते 4/200 मध्ये नूतनीकरण करणे ता. शिरपूर जि. धुळे (किंमत रु. 1 कोटी).
सावळदे, सुकवद रस्ता रामा-12 किमी 4/800 वरील ब्रिटीशकालीन गिधाडे पुलाचे संरक्षणात्मक सक्षमीकरण करणे, ता. शिरपूर जि. धुळे (किंमत रु. 3 कोटी).
सावळदे, सुकवद, शिंदखेडा रस्ता रा.मा.12 कि.मी. 0/00 ते 4/800 मध्ये सुधारणा करणे, ता.शिरपूर जि.धुळे (भाग- सावळदे ते सुकवद (किंमत रु. 3.50 कोटी).
मालकातर, बोराडी, सांगवी रस्ता रामा-1 कि.मी. 67/700 ते 69/300, 72/00 ते 72/850, 76/665 ते 79/045 मध्ये सुधारणा करणे ता. शिरपूर जि.धुळे (किंमत रु. 4 कोटी).
चोंदी, झेंडेअंजन, पनाखेड रस्ता प्रजिमा-6 किमी 5/00 ते 5/800 मध्ये डांबरी नूतनीकरण करणे व कि.मी. 7/200 ते 10/00 मध्ये सुधारणा करणे ता. शिरपूर जि. धुळे (भाग चोंदी ते खाऱ्या दोंदवाडीपाडा) (किंमत रु. 2 कोटी 37 लक्ष 50 हजार).
शिरपूर, आढे, थाळनेर, मांजरोद, होळनांथे, बभळाज रस्ता प्रजिमा-12 किमी 5/200 ते 5/400, 5/500 ते 10/900, 11/300 ते 12/300, 15/00 ते 16/300, 19/00 ते 21/500, 29/800 ते 30/00, 33/800 ते 36/700 मध्ये सुधारणा करणे, ता. शिरपूर जि. धुळे (भाग: राममा-3 ते आढे, आढे ते थाळनेर, होळनांथे ते बभळाज) (किंमत रु. 3.42 कोटी).
खंबाळे ते रा.म.मा. क्र. 3 रस्ता रा.मा. 16 कि.मी. 00/00 ते 6/00 चे बांधकाम करणे, ता. शिरपूर जि. धुळे (किंमत रु. 1 कोटी).
आंबे ते इजिमा-41 रस्ता कि.मी. 0/00 ते 4/00 चे बांधकाम करणे ता. शिरपूर जि. धुळे. (किंमत रु. 1.25 कोटी).
बोराडी, न्यू बोराडी, उमर्दे, वकवाड, पळासनेर प्रजिमा-5 कि.मी. 5/700, 7/150, 7/450 मध्ये स्लॅब ड्रेन सह जोडरस्त्याचे बांधकाम करणे, ता. शिरपूर जि. धुळे (किंमत रु. 50 लक्ष). शिरपूर जि. धुळे येथे सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. 1, शिरपूर कार्यालयाची इमारत बांधकाम करणे (किंमत रु. 1 कोटी 48 लक्ष 77 हजार) असा एकूण 22 कोटी 53 लक्ष 27 हजार रुपयांचा भरघोस आर्थिक निधी माजी शिक्षण मंत्री आ. अमरिशभाई पटेल व आ.काशिराम पावरा यांच्या प्रयत्नाने मंजूर झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे.