June 30, 2025 7:52 am

मुंबईच्या वाहतुक पोलीस आयुक्तांकडे टॅक्सीचालकांविरोधात असंख्य तक्रारी

अपनी भाषा में पढ़े! Translate

मुंबईच्या वाहतुक पोलीस आयुक्तांकडे टॅक्सीचालकांविरोधात असंख्य तक्रारी
प्रतिनिधी-अर्जुन आहेर

ओला, उबेर तसंच इतर टॅक्सीचालकांच्या संघटनांचे प्रतिनिधी आणि मुंबईचे वाहतुक पोलीस आयुक्त यांच्यात आज बैठक झाली. मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे या टॅक्सीचालकांविरोधात असंख्य तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित केली होती.

या टॅक्सीचालकांनी वाहन थांबवण्यासह, वाहतुकीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करायला हवं अशी सूचना वाहतुक पोलीस आयुक्तांनी या बैठकीत केली. यासोबतच या टॅक्सिचालकांसाठी पुरेसे स्टँड उपलब्ध नाहीत यावरही या बैठकीत चर्चा झाली.

नवे स्टँड उभारण्यासाठी संभाव्य स्टँडची यादी वाहतूक पोलिसांना सादर करावी अशी सूचनाही पोलीस आयुक्तांनी केली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!