नवाब मलिक यांची कोठडीतून मुक्तता करायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
प्रतिनिधी-अर्जुन आहेर
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची न्यायालयीन कोठडीतून मुक्तता करायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. मलिक यांना मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत २३ फेब्रुवारीला सक्तवसुली संचालनालयानं अटक केली होती.
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या साथीदाराच्या कथित मालकीच्या जमिनीच्या खरेदी प्रकरणी त्यांच्याविरुद्ध ही कारवाई केली आहे. या अटकेला त्यांनी आव्हान दिलं असून, आपली तात्काळ सुटका करावी अशी विनंती मलिक यांनी न्यायालयाला केली होती. मात्र न्यायमूर्ती पी.बी वरळे आणि न्यायमूर्ती एस एम मोडक यांच्या पीठानं आज ती फेटाळली.