माहितीचा अधिकार कायदा कमकुवत करण्याचा डाव?; अण्णा हजारेंचा सरकारला इशारा

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260621-WA0563

माहितीचा अधिकार कायदा कमकुवत करण्याचा डाव?; अण्णा हजारेंचा सरकारला इशारा.

 

मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव.

माहितीचा अधिकार (RTI) कायद्याचे रक्षण करण्यासाठी वयाच्या नव्वदाव्या वर्षीही सरकारविरोधात उपोषण करण्याची वेळ आली, अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र शासनाने १२ जून २०२६ रोजी जाहीर केलेल्या नव्या नियमांमुळे माहितीचा अधिकार कायदा कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची गंभीर चिंता त्यांनी व्यक्त केली.

अण्णा हजारे यांनी म्हटले की, माहितीचा अधिकार हा सामान्य नागरिकांच्या हातातील भ्रष्टाचाराविरोधातील प्रभावी शस्त्र आहे. मात्र, नव्या नियमांमुळे नागरिकांना माहिती मिळविण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. सरकारने जनहिताचा विचार करून हे नियम तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

पत्रकारांशी संवाद साधताना अण्णा हजारे म्हणाले, “माझे वय आता ९० वर्षे झाले आहे. मात्र, माहितीचा अधिकार कायदा वाचविण्यासाठी आणि नागरिकांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी मी पुन्हा आंदोलन उभारण्यास तयार आहे.” सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. अण्णा हजारे यांच्या या भूमिकेमुळे राज्यभरातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!