आंतरराष्ट्रीय योग दिन मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे योग, मोफत मोतीबिंदू शिबिर

अपनी भाषा में पढ़े! Translate

आंतरराष्ट्रीय योग दिन मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे योग, मोफत मोतीबिंदू शिबिर

 

अमळनेर : विक्की जाधव.

मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे जागतिक योग दिनानिमित्त रविवार, दि. 21 जून 2026 रोजी नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी विशेष योग शिबिर व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री मंगळग्रह मंदिरात सकाळी 7 ते 10 या वेळेत योग शिबिर होईल. या उपक्रमातून आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासोबतच नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

योग शिबिरात आरोग्यदायी जीवनशैली, तणावमुक्ती, प्राणायाम तसेच ध्यान याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते, याबाबतही उपस्थितांना माहिती दिली जाईल. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत तपासणी, आवश्यक औषधोपचार आणि मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे गरजू व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या दोन्ही शिबिरांत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोफ्लदवावा, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्यासह समस्त विश्वस्त मंडळाने केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!