RTE विद्यार्थ्यांकडून शुल्क घेऊ नका; शाळांना शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे स्पष्ट आदेश

अपनी भाषा में पढ़े! Translate

RTE विद्यार्थ्यांकडून शुल्क घेऊ नका; शाळांना शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे स्पष्ट आदेश.

 

मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव.

RTE अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून पुस्तके, गणवेश किंवा इतर शैक्षणिक साहित्याच्या नावाखाली कोणतेही पैसे घेऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज्यातील सर्व शाळांना दिले आहेत. शिक्षण हा मुलांचा मूलभूत हक्क असून, आर्थिक कारणांमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या आदेशानंतर शाळांनी RTE विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची वसुली केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. शासनाकडून विद्यार्थ्यांना आवश्यक पुस्तके व गणवेश पुरवले जाणार असल्याने पालकांनी कोणत्याही दबावाखाली पैसे देऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या निर्णयामुळे पालकांना मोठा दिलासा मिळणार असून, शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि समानता वाढण्यास मदत होणार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!