शहापूरजवळील फरशी पुलाने घेतला बळी; निष्काळजीपणाविरोधात FIRची मागणी

अपनी भाषा में पढ़े! Translate

शहापूरजवळील फरशी पुलाने घेतला बळी; निष्काळजीपणाविरोधात FIRची मागणी..

 

अमळनेर : विक्की जाधव.

तालुक्यातील शहापूरजवळ सुरू असलेल्या फरशी पुलाच्या कामातील गंभीर निष्काळजीपणामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास, कळमसरे-शहापूर रस्त्यावर पुलाच्या खड्ड्यात दुचाकीस्वार कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावर कोणतीही पूर्वसूचना, चेतावणी फलक किंवा सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांनी मारवड पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करून संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) व कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, हा प्रकार सरळसरळ निष्काळजीपणा (Negligence) असून भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४अ, २७९, ३३७, ३३८ अंतर्गत गुन्हा नोंदवला जावा. तसेच Lalita Kumari vs Govt of UP या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, Cognizable offence आढळल्यास FIR नोंद करणे पोलिसांसाठी बंधनकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!