“कायद्याचे रक्षकच दोषी” न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल 9 पोलिसांना फाशीची शिक्षा
मार्मिक न्यूज नेटवर्क :
तामिळनाडू : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या सतानकुलम कोठडी मृत्यू प्रकरणात मदुराई जिल्हा सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत 9 पोलिसांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे पोलीस कोठडीत होणाऱ्या अत्याचारांवर कठोर संदेश गेला असून न्यायव्यवस्थेने पीडितांना दिलासा दिल्याचे मानले जात आहे.
जून 2020 मध्ये कोरोना काळात व्यापारी पी. जयराज आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स यांना लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. मात्र कोठडीत झालेल्या अमानुष मारहाणीमुळे दोघांची प्रकृती खालावली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने देशभर संतापाची लाट उसळली होती.
दरम्यान, दीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने मार्च 2026 मध्ये सर्व पुराव्यांच्या आधारे 9 पोलिसांना दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली. या निकालामुळे “कायद्याचे रक्षकच भक्षक ठरल्यास शिक्षा टळणार नाही” असा संदेश जगभरात गेला असून अशा घटनांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.