शहापूर-कळमसरे रस्त्यावर भीषण अपघात; ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे घरातील कर्त्या मुलाचा गेला जीव; कारवाईची मागणी

अपनी भाषा में पढ़े! Translate

शहापूर-कळमसरे रस्त्यावर भीषण अपघात; ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे घरातील कर्त्या मुलाचा गेला जीव; कारवाईची मागणी

 

अमळनेर : विक्की जाधव.

शहापूर कळमसरे रस्त्यावर सुरू असलेल्या अंदाजे ४ कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामामुळे एक भीषण अपघात घडून तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या कामाच्या ठिकाणी कोणतेही सूचना फलक, इशारे किंवा सुरक्षिततेची उपाययोजना नसल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सुनील सीताराम शिंदे हा तरुण हळदीचा कार्यक्रम आटोपून आपल्या घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. पुलाचे काम सुरू असल्याची कोणतीही पूर्वसूचना नसल्याने त्याला अंदाज आला नाही आणि त्याची बुलेट थेट काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन धडकली. या भीषण धडकेत सुनील शिंदे याचा जागीच मृत्यू झाला, ज्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर संतप्त नागरिकांकडून ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. सार्वजनिक बांधकामांमध्ये सुरक्षा नियमांचे पालन न केल्यास अशा दुर्घटना टाळता येणार नाहीत, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!