पत्रकारांच्या कुटुंबांना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा आधार; आर्थिक मदत व सांत्वन..

अपनी भाषा में पढ़े! Translate

पत्रकारांच्या कुटुंबांना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा आधार; आर्थिक मदत व सांत्वन..

 

अमळनेर : विक्की जाधव.

पत्रकारांप्रती सामाजिक बांधिलकी जपत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने गरजू पत्रकारांच्या कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. अमळनेर येथील पत्रकार मधुसूदन वसावे यांच्या पत्नीवर मुंबई येथे उपचार सुरू असून, आर्थिक अडचणी लक्षात घेता संघटनेच्या वतीने २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली.

प्रदेश सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले यांच्या पुढाकाराने ही मदत देण्यात आली असून, पुढील उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देण्याचेही आश्वासन देण्यात आले. तसेच अलीकडेच निधन झालेल्या पत्रकार योगेश महाजन यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यात आले. कुटुंबाला मानसिक आधार देत, मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही संघटनेने स्पष्ट केले.या दोन्ही प्रसंगी जयेशकुमार काटे, उमेश काटे, जयंत वानखेडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या या उपक्रमामुळे पत्रकारांमध्ये एकात्मता आणि आधाराची भावना अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!