चैताली पाटील हिची मुंबई पोलीस दलात निवड गावकऱ्यांनी वाजत गाजत काढली मिरवणूक
अमळनेर : विक्की जाधव.
तालुक्यातील वाघोदे येथील चैताली रामकृष्ण पाटील हिची मुंबई पोलीस दलात निवड झाली असून नुकतेच तिने नागपूर येथे प्रशिक्षण पूर्ण केले आहे, प्रशिक्षण पूर्ण करून गावी परतल्यावर वाघोदे ग्रामस्थांनी चैताली चे जोरदार स्वागत करत गावातून सवाद्य भव्य मिरवणूक काढली,

चैताली चे आईवडील मोलमजुरी करतात, जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर चैतालीने पोलीस पदा पर्यंत मजल मारली असून गेल्या दोन वर्षी तिच्या मोठ्या भावाची,पवन ची भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे,भाऊ देशाच्या रक्षनार्थ सीमेवर कर्तव्य बजावत असून आता बहीण चैताली देखील भावाच्या पाऊला वर पाऊल ठेवत मुंबईकरांच्या सेवेत आपले कर्तव्य बजावणार आहे, कुटुंबातील कोणी मोठ्या पदावर नसताना, आई वडिलांची आर्थिक कुवत नसताना, फक्त अभ्यासाच्या, आणि मेहनतीच्या जोरावर चैताली आणि तिच्या भावाने आजच्या तरुणांई पुढे आदर्श उभा केला आहे,फक्त च मुलेच नाही तर मुलीही आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल करू शकतात, हे चैतालीने दाखवून दिले आहे. तीचा आदर्श गावातील तरुणाई ने घ्यावा, तसेच तीने वाघोदे गावाचे नाव उज्वल केल्याने, भाजपाचे जानवे मंडळ अध्यक्ष जिजाबराव पाटील, दामू अण्णा पाटील, राहुल पाटील, हितेश पाटील व मयूर पाटील यांच्या सह ग्रामस्थांनी, चैतालीची मिरवणूक काढली तसेच ,आई वडिलांचा सत्कार करून चैतालीला पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा दिल्या आहेत