पाण्याच्या प्रश्नावर अमळनेर नगरपरिषद फेल; नागरिकांचा संताप वाढतोय .

अपनी भाषा में पढ़े! Translate

पाण्याच्या प्रश्नावर अमळनेर नगरपरिषद फेल; नागरिकांचा संताप वाढतोय .

 

अमळनेर : विक्की जाधव.

शहरात पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर नगरपरिषदेविरुद्ध नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. निवडणुकीच्या वेळी परीक्षित बाविस्कर यांच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

 

“पाणी द्या नाहीतर खुर्ची खाली करा”

अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत असून पाणीपुरवठा विभागाचे सभापती कैलास पाटील यांच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उन्हाळा अजून पूर्णपणे सुरू झाला नसताना ही परिस्थिती असेल तर एप्रिल-मे महिन्यात अमळनेरकरांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्शभूमीवर

शहरातील धुळे रोडवरील जिप विश्रामगृहाजवळ असलेल्या गणेश कॉलनी परिसरातील नागरिकांना गेल्या सात महिन्यांपासून नळाला पिण्याचे पाणीच मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या भागातील सुधाकर देशमुख, प्रवीण रामदास पाटील आणि अरविंद मुंडके या तिन्ही कुटुंबांना पाण्यासाठी शेजाऱ्यांकडे जावे लागत असून पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

विशेष म्हणजे पाणीपुरवठा होत नसतानाही पाणीपट्टी व इतर कर वसुलीसाठी पालिकेचे कर्मचारी मात्र नियमित तगादा लावत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक वेळा पाईपलाईन खोदून तपासणी करण्यात आली, मात्र दोष आढळला नसल्याचे सांगण्यात येत असल्याने नागरिक अधिकच त्रस्त झाले आहेत. मूलभूत सुविधा देण्यात पालिका अपयशी ठरत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे.

“आम्ही पालिकेचे सर्व कर नियमित भरतो, त्यामुळे पिण्याचे पाणी देणे हे पालिकेचे कर्तव्य आहे. नगरअध्येक्ष उपाध्येक्ष यांनी आमचा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा,” अशी मागणी नागरिक सुधाकर देशमुख यांनी केली आहे.

दरम्यान, पुढील काळात अमळनेर शहराचा यात्रा उत्सव देखील येत असल्याने त्या काळात पाणीपुरवठ्याची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन पाणीप्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!