पिंगळवाडे जि.प. शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

अपनी भाषा में पढ़े! Translate

पिंगळवाडे जि.प. शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

 

अमळनेर : विक्की जाधव.

तालुक्यातील पिंगळवाडे येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाला अमळनेरचे गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, केंद्रप्रमुख चंद्रकांत साळुंखे, प्रा. पंकज पाटील यांच्यासह मान्यवर, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे शाळेचा परिसर विद्यार्थ्यांच्या कला आणि उत्साहाने फुलून गेला होता.

स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्यप्रकार, देशभक्तीपर गीते आणि ऐतिहासिक नाटके यांना प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. इतिहासावर आधारित नाटकांमधून विद्यार्थ्यांनी शौर्य, देशभक्ती आणि संस्कारांचा संदेश दिला. लहान विद्यार्थ्यांनी सादर केलेली नृत्ये व गाणी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना ठेंग, सोनाली पाटील, ज्ञानेश्वर महाजन, सीमा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी शाळेचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!