१२ दिवस पाणी नाही, जे आलं ते गटारीचं नागरिकांचा प्रशासनावर संताप” कुठं गेले पाणीपुरवठा सभापती?
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील राजाराम नगर परिसरात पाणीपुरवठ्याबाबत धक्कादायक प्रकार समोर आला असून प्रशासनाच्या निष्काळजी कारभारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्रथमेश भाऊ पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
सत्तेत आलो की दोन दिवसावर पाणी देऊ म्हणणारे नगराध्यक्ष ही दिसेना झालेत.
मागील बारा दिवसांपासून परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत होता. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना अखेर नळाला पाणी आले, मात्र ते स्वच्छ नसून गटारीमिश्रित, दुर्गंधीयुक्त व काळपट असल्याचे समोर आले. यावेळी पाण्याची एक्सपायरी सांगणारे कुठं गेले पाणीपुरवठा सभापती? अश्या संतप्त प्रतिक्रिया देत नागरिकांनी नळातून येणारे गढूळ पाणी भरून दाखवत प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड केला. या पाण्याला तीव्र दुर्गंध येत असून ते पिण्यासाठी तर दूरच, घरगुती वापरासाठीही अयोग्य असल्याचे नागरिकांनी सांगितले. या दूषित पाण्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वारंवार तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासन व पाणीपुरवठा विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. “बारा दिवस पाणी नाही, आणि जे दिलं ते गटारीचं!” अश्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत. तत्काळ स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ही राजाराम नगरमधील नागरिकांनी दिला आहे.