गॅस टंचाईवर रॉकेलचा पर्याय; पण स्टोव्हच नाही तर रॉकेल भरणार कशात?

अपनी भाषा में पढ़े! Translate

गॅस टंचाईवर रॉकेलचा पर्याय; पण स्टोव्हच नाही तर रॉकेल भरणार कशात?..

 

अमळनेर : विक्की जाधव.

गॅस सिलिंडर टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे आधीच कठीण झाले असताना त्यावर उपाय म्हणून रॉकेलचा पर्याय पुढे आणण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहे.

प्रथमेश भाऊ पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 

मात्र अनेक घरांमध्ये आता रॉकेल स्टोव्हच शिल्लक नाहीत. गॅस युग आल्यापासून लोकांनी स्टोव्ह वापरणे बंद केले असून आता अचानक रॉकेल वापरा असे सांगितल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे.

ग्रामीण व शहरी भागात अनेक कुटुंबांकडे ना स्टोव्ह आहेत ना रॉकेल साठवण्यासाठी साधन. अशा परिस्थितीत रॉकेल हा पर्याय देणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. गॅस टंचाईचा मूळ प्रश्न सोडवण्याऐवजी तात्पुरते उपाय सांगून सरकार जबाबदारी झटकत आहे का असा सवालही नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

सामान्य माणसाला स्वयंपाकासाठी गॅस हा आज जीवनावश्यक घटक बनला आहे. त्यामुळे गॅस पुरवठा सुरळीत करणे, काळाबाजार थांबवणे आणि वितरण व्यवस्था सुधारण्याची गरज आहे. अन्यथा रॉकेलसारखे पर्याय देऊन प्रश्न सुटणार नसून सर्वसामान्यांचे जीवन अधिक कठीण होणार हे मात्र नक्की.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!