महिलांच्या कर्तृत्वाला सलाम; संताजी महिला मंडळाचा प्रेरणादायी उपक्रम

अपनी भाषा में पढ़े! Translate

महिलांच्या कर्तृत्वाला सलाम; संताजी महिला मंडळाचा प्रेरणादायी उपक्रम

अमळनेर : विक्की जाधव.

श्री संताजी महिला मंडळातर्फे ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत समाजात महिलांचे योगदान अधोरेखित करण्यात आले.

या कार्यक्रमाला दीप फाउंडेशनच्या सर्वेसर्वा डॉ. रेखाताई चौधरी, सौ. अनिताताई चौधरी, रेनबो हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अंजली महाजन, डॉ. अरुणाताई चौधरी तसेच नगरसेविका सौ. अनुजा चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. आशालताई चौधरी होत्या.

यावर्षी महिलांबरोबरच लहान मुलांच्या गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाच्या अध्यक्ष विता शिरसाठ व उपाध्यक्षा सौ. नीलाताई चौधरी यांच्या संकल्पनेतून ‘सशक्त महिला – सक्षम समाज’ या उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. इंदुबाई चौधरी, सौ. अनिता चौधरी, सौ. रेखा बागुल, सौ. आशा चौधरी, सौ. रंजना चौधरी, सौ. शुभांगी चौधरी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रिना चौधरी यांनी केले तर आभार सौ. विशाखा चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!