समाजसेवा, वैद्यकीय सेवा आणि सांस्कृतिक चळवळीचा ध्यास; डॉ. अपर्णा मुठ्ठे यांचे कार्य कायम स्मरणात राहण्यासारखे” मकसूद बोहरी 

अपनी भाषा में पढ़े! Translate

समाजसेवा, वैद्यकीय सेवा आणि सांस्कृतिक चळवळीचा ध्यास; डॉ. अपर्णा मुठ्ठे यांचे कार्य कायम स्मरणात राहण्यासारखे” मकसूद बोहरी 

अमळनेर : विक्की जाधव.

सामाजिक, सांस्कृतिक आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अमळनेरच्या ज्येष्ठ समाजसेविका स्व. डॉ. अपर्णा मुठ्ठे यांचे नुकतीच दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने अमळनेर शहरातील सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. मुठ्ठे कुटुंबाच्या सूनबाई असलेल्या डॉ. अपर्णाताई यांनी आपल्या कर्तृत्व, परिश्रम आणि समाजकार्यातील सातत्यपूर्ण योगदानातून शहरात एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

शिस्तप्रिय स्वभाव, हजरजबाबीपणा आणि चेहऱ्यावर कायम असलेले स्मितहास्य यामुळे त्या सर्वांच्या ‘अपर्णाताई’ बनल्या होत्या. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले.

अमळनेर शहरात प्रथमच महिलांसाठी स्वतंत्र लेडीज जिम आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र अभ्यासिका उभारण्यामागे त्यांचा मोठा वाटा होता. नगरपरिषदेच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या सुविधांचा आजही अनेक महिला आणि विद्यार्थिनी लाभ घेत आहेत. महिलांनी आत्मनिर्भर व्हावे आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने त्यांनी अमळनेर महिला मंच ट्रस्ट स्थापन करून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना दिली.
महिला मंचच्या माध्यमातून महिलांसाठी विविध स्टॉल, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आणि कला सादरीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. गृहिणींनी तयार केलेले खाद्यपदार्थ, हस्तकला किंवा इतर कलाकृतींचे प्रदर्शन भरवून त्यांना आर्थिक आधार मिळावा हा त्यामागील उद्देश होता. तसेच २०२४ मध्ये त्यांनी आयोजित केलेली सर्व धर्म परिषद हा समाजात सलोखा आणि बंधुभावाचा संदेश देणारा उल्लेखनीय उपक्रम ठरला होता. विविध धर्मांच्या धर्मगुरूंना एकत्र आणून समाजात शांतता आणि परस्पर आदर टिकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
वैद्यकीय क्षेत्रातही डॉ. अपर्णा मुठ्ठे यांनी मोठे योगदान दिले. सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ म्हणून त्यांनी आपल्या पती स्व. डॉ. चंद्रशेखर मुठ्ठे यांच्या सहकार्याने अनेक गरजू रुग्णांना अत्यल्प दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. ग्रामीण भागात आरोग्य शिबिरे, तसेच भिल्ल समाजातील मुलांसाठी रोटरीच्या माध्यमातून प्राथमिक शाळा उभारण्यास त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या निधनाने अमळनेरच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैद्यकीय क्षेत्रात न भरून येणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, डॉ. अपर्णा मुठ्ठे यांच्या कार्याचा आढावा घेत अमळनेरचे सामाजिक कार्यकर्ते मकसूद बोहरी यांनी लिहिलेल्या लेखातून त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची आणि समाजासाठी केलेल्या कार्याची आठवण जागवण्यात आली आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल, अशी भावना अमळनेरकरांकडून व्यक्त होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!