विवाहबाह्य संबंधातून खुनाचा कट? आरोपीला उच्च न्यायालयाचा जामीन..

अपनी भाषा में पढ़े! Translate

विवाहबाह्य संबंधातून खुनाचा कट? आरोपीला उच्च न्यायालयाचा जामीन..

धुळे : मार्मिक न्यूज नेटवर्क

विवाहितेच्या खून प्रकरणातील आरोपी प्रज्ञा कर्डिले हिला अखेर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणात धुळे येथील देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथील शारदा बागुल यांचा विवाह कपिल बागुल यांच्याशी झाला होता. शारदा बागुल यांना मारहाण करून तसेच विषारी औषध सलाईनद्वारे देऊन त्यांचा खून करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात तिचे पती कपिल बागुल यांच्यासह इतर चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपासादरम्यान प्रज्ञा कर्डिले हिचे कपिल बागुल यांच्याशी विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप समोर आला. या संबंधातूनच प्रज्ञा कर्डिले हिने कपिल बागुल यांच्यासोबत कट रचून दोन आरोपींना खुनाची सुपारी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर देवपूर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपी प्रज्ञा कर्डिले हिने जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता; मात्र तो अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर प्रज्ञा कर्डिले हिने अॅड. निलेश भागवत यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. उच्च न्यायालयात झालेल्या युक्तिवादात अर्जदाराच्या वतीने असा दावा करण्यात आला की, प्रज्ञा कर्डिले हिचे कपिल बागुल यांच्याशी संबंध असल्याच्या संशयावरूनच तिचे नाव या प्रकरणात गोवण्यात आले आहे. तसेच गुन्ह्यात तिचा थेट सहभाग असल्याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचेही मांडण्यात आले. सर्व बाबींचा विचार करून माननीय उच्च न्यायालयाने आरोपी प्रज्ञा कर्डिले हिचा जामीन अर्ज मंजूर केला. या प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. निलेश भागवत यांनी काम पाहिले असून त्यांना अॅड. सुप्रिया बुधलकर व अॅड. संकेत कुंजीर यांनी सहकार्य केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!